युद्ध संपले पण संघर्ष शिगेला : गायब झालेले युरेनियम इराणला ……. ; अमेरिकेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून ।। इराण -इस्रायल यांच्यातील युद्ध संपले असेल तरी या दोन देशांमधील तणाव आणि संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणच्या फोर्डोमधून गायब झालेल्या 400 किलो समृद्ध युरेनियमवरून हा संघर्ष सुरू आहे. हे समृद्ध युरेनियम जगासाठी धोकादायक असून इराणला ते आमच्याकडे सोपवावे लागेल, असे इस्रायल आणि अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणमधील संबंध तणावपूर्ण आहेत.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले आहे की, इराणला अण्वस्त्र बनवायची क्षमता असून अणु समृद्धीचे त्यांचे काम सुरू आहे. हे जगासाठी धोकायदक ठरू शकते. अणुबॉम्ब समृद्ध युरेनियमपासून बनवले जातात. इराणने त्यांचे युरेनियम 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध केले आहे असे मानले जाते. ही अमुसमृद्धीची पातळी 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली तर इराण अणुबॉम्ब बनवू शकतो. त्यामुळे गायब झालेल्या 400 किलो युरेनियमचा मुद्दा संघर्षाचे मूळ बनला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणला सांगितले आहे की, त्यांनी त्यांचे समृद्ध युरेनियम सोपवावे. याबाबत काट्झ यांनी इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेच्या हल्ल्यांबद्दल चर्चा केली. काट्झ म्हणाले, सुरुवातीपासूनच हे स्पष्ट होते की या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या पायाभूत सुविधा नष्ट होतील, त्यामुळे अणुसामग्री नष्ट होणार नाही. आता अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणला सांगत आहेत की, ‘तुम्हाला हे साहित्य सोपवावे लागेल.’ याचा अर्थ इराणला त्यांचे समृद्ध युरेनियम सोपवावे लागेल.

काट्झ म्हणाले की इस्रायलने इराणवर केलेल्या अलिकडच्या हल्ल्यांचे उद्दिष्ट त्यांच्या क्षमता निष्प्रभ करणे हे होते. त्यांनी दावा केला की, आज त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवण्याचा कोणताही मार्ग नाही, कारण आम्ही युरेनियमचे घन स्वरूपात रूपांतर करणारी हस्तांतरण सुविधा देखील नष्ट केली आहे. त्यामुळे इराणला समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवावे लागेल, असा इशारा इस्रायल आणि अमेरिकेने इराणला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *