महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनांमध्ये तुम्ही टेन्शन फ्री गुंतवणूक करु शकतात. कारण या योजनांवरील परताव्याची सरकार स्वतः गॅरंटी देते.प्रत्येकाने भविष्यासाछी गुंतवणूक करावी, या उद्देशातून अशा योजना राबवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन त्यांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. (Post Office NSC Scheme)
पोस्ट ऑफिसची योजना (Post Office Scheme)
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत (NSC) गुंतवणूक करतात. ही योजना पोस्टाद्वारे चालवली जाते. या योजनेत तुम्हाला गॅरंटीज रिटर्न मिळते.या योजनेत सरकार आकर्षक व्याजदर देते.
सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तिमाही आधारावर व्याजदर दिले जाते. सध्या ७.७ टक्के व्याद दिले जाते. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते.
या योजनेत ५ वर्षांचा लॉक इन पीरियड आहे. या योजनेत गुंतवणूक ही पूर्णपणे सुरुक्षित असणार आहे. यात कोणत्याही प्रकारची रिस्क नाही.
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही १००० रुपये भरुन अकाउंट उघडू शकतात. तसेच जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतात. यासाठी कोणतीही लिमिट नाही आहे.
या योजनेत जर १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचे अकाउंट उघडले तर ते १८ वर्षानंतर मॅच्युअर होते. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात.
पोस्टाच्या या योजनेत जर तुम्ही २५ लाख रुपये गुंतवले तर ७.७ टक्के चक्रव्याढ व्याज मिळते. त्यामुळे ५ वर्षात तुम्हाला ३६,४७,५८२ रुपये मिळणार आहे. यामध्ये फक्त व्याजातूनच तुम्हाला ११,४७,५८२ रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही वित्तीय संस्थेतून लोन घेऊ शकतात.या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट दोन्ही अकाउंट उघडू शकतात.