महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यानंतर आता सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना 40 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती.
मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय…
योजना नेमकी काय होती? ते पाहूयात..
लाडकीसाठी काय होती कर्ज योजना?
जिल्हा बँकेकडून लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची होती घोषणा
व्यवसायासाठी एकरकमी 40 हजार दिले जाणार होते
कर्जाचे हप्ते 1500 रुपयांमधून कापून घेणार होते
लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी होती कर्जाची योजना
आदिती तटकरेंच्या माहितीमुळे लाडक्या बहिणींसाठी कर्जाची कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारने 2025-26 साठी 36 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता. अशात तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीसाठी केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवलीय. आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीय, हेच यातून स्पष्ट होतंय.