महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। राज्यसभेत राष्ट्रपतींकडून नियुक्ती म्हणजे कायदा क्षेत्रात केलेल्या कामाचे फळ आहे. माझा कायद्याचा अभ्यास देशाच्या ऐक्याकरीता तसेच देशातील लोकशाही आणि संविधान प्रबळ राहील यासाठी प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया खासदार म्हणून नियुक्तीनंतर उज्वल निकम यांनी दिली. त्यांनी खासदार म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार ही मानले.
मोदींचा फोन आणि मराठीतून संवाद
माध्यमांशी बोलताना निकम यांनी सांगितले की, “काल पंतप्रदान मोदींचा ८ वाजून ४४ मिनिटांनी फोन आला होता. त्यांनी पहिला प्रश्न मराठीत विचारला; म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत. यावर मी म्हटलं आपलं दोन्ही भाषेवर प्रभूत्व आहे. कोणत्याही भाषेत बोलू शकता. यावर मोदींनी मराठीत संभाषण केले. ते म्हणाले, “राष्ट्रपती आपल्यावर मोठी जबाबदारी देणार आहेत. ती देशासाठी चांगली सांभाळाल यासाठी शुभेच्छा देतो.”