IRCTC Malaysia and Singapore Tour: मग IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेजचा आनंद घ्या!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। तुम्हालाही मलेशिया-सिंगापूरला फिरण्याचं स्वप्न आहे का? तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे पर्यटन विभागाने एक भन्नाट टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेजची सर्व माहिती तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.

मलेशिया आणि सिंगापूर हे दोन्ही देश त्यांच्या आधुनिक जीवनशैली, समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, भव्य मॉल्स आणि अ‍ॅडव्हेंचर स्पॉट्ससाठी प्रसिद्ध आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला या देशांतील अनेक प्रसिद्ध आणि आकर्षक ठिकाणी भेट देण्याची संधी मिळणार आहे.तीही अतिरिक्त सेवा यात समाविष्ट नाही.

पॅकेजमध्ये काय पाहायला मिळेल?

या IRCTC टूर पॅकेजचे नाव आहे “Magical Malaysia with Singapore Sensation”.

यामध्ये पुढील ठिकाणांची सफर समाविष्ट आहे:

बाटू गुंफा, किंग्स पॅलेस, राष्ट्रीय स्मारक

मॅडम तुसाद म्युझियम, IOS म्युझियम

Wings of Time या प्रसिद्ध लाईट शोचाही आनंद मिळेल

याशिवाय अनेक इतर आकर्षक पर्यटनस्थळांनाही भेट दिली जाईल. हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची (ब्रेकफास्ट, लंच, डिनर) संपूर्ण सोय पॅकेजमध्येच समाविष्ट आहे.

किती दिवसांचा असेल हा टूर?

हा टूर ७ दिवस आणि ६ रात्रींचा असेल.

११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता हैदराबाद विमानतळावर चेक-इन प्रक्रिया होईल आणि रात्री ११:१० वाजता विमान मलेशियासाठी उड्डाण करेल.

तुम्हाला 3-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था दिली जाईल.

संपूर्ण ट्रिप दरम्यान स्थानिक टूर गाइडही सोबत असेल.

पॅकेजचे दर

सिंगल शेअरिंग: 1,49,230

डबल शेअरिंग: 1,21,980

ट्रिपल शेअरिंग: 1,21,860

५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी: 1,09,560

पॅकेज कोड: SHO1
IRCTC च्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे बुकिंग करता येईल. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधू शकता: 8287932230, 8287932229, 8287932228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *