Gold Rate Today: सोनं महागलं ; २२ अन् २४ कॅरेटचे दर काय? पहा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। सोन्याचे दर जवळपास १ लाख रुपये झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे परवडत नाही. त्यात अनेकजण सणासुदीला सोने खरेदी करतात. आता सोन्याचे दर वाढल्याने अनेकांनी सोने खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली आहेत. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.

सोन्याचे दर वाढले (Gold Rate Hike Today)
आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ९९,८८० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९०४ रुपये आहेत. या दरात १३६ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, १० तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)
आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,२४० रुपये झाले आहेत. या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९१,५५० रुपये झाले आहेत. या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे तर १०० ग्रॅम सोन्याचे दर १५०० रुपयांनी वाढले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ७४,९१० रुपये आहेत. या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,९२८ रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)
आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दर जैसे थे वैसे आहेत.८ ग्रॅम चांदीचे दर ९२० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१५० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,५०० रुपये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *