Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन यावर्षी वाढवून देण्यात आली आहे. तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. आयटीआर फाइल केल्यानंतर त्याचा रिफडं लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाईल. रिफंड थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाईल.

याबाबत आयकर विभागाने अजून कणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु तुम्ही जेवढ्या लवकर आयटीआर फाइल करणार तेवढे तुमच्यासाठी फायद्याचे असते.

जर तुम्ही डेडलाइन आधी आयटीआर (ITR) फाइल केला आणि जर चुकून रिटर्न फाइल करताना काही चुक झाली तर त्याची प्रोसेसिंग लवकर केली जाईल. त्यानंतर तुमच्या खात्यात रिफंड जमा होईल. एक्सपर्टच्या मते, मे आणि जून महिन्यात रिटर्न डेटा मॅच केला जातो. त्यानंतर आयटीआर फाइल केला जातो. यानंतर २ ४ आठवड्यांमध्ये प्रोसेसिंग होते. जे करदाते एकदम मुदत संपायच्या वेळी आयटीआर फाइल करतात त्यांच्या रिटर्न प्रोसेसिंगमध्ये खूप वेळ लागतो.

आयटीआर फाइल करताना चुका करू नका (Avoid These Mistakes While File ITR)
आयटीआर लवकर फाइल केल्यावर त्याची प्रोसेसिंग लवकर होते. परंतु आयटीआर फाइस करताना कोणतीही चुकी करु नका, जर तुम्ही फॉर्म 26AS मधील माहिती चुकीची लिहली तर अनेक अडचणी येऊ शकतात. इन्कम टॅक्स विभाग रिव्ह्यू साठी सिलेक्ट करु शकतात. यामुळे रिफंड येण्यासाठी ६०-९० दिवस उशीर होऊ शकतो.

रिटर्नची प्रोसेस
इन्कम टॅक्स विभाग आयटीआर व्हेरिफिकेशन झाल्यावरच रिफंडची प्रोसेस सुरु करतात. त्यामुळे प्रोसेसिंगचा वेळ प्रत्येक करदात्यासाठी वेगवेगळा असतो. आटीआर फाइल केल्यानंतर रिटर्नमध्ये जर कोणताही डेटा मॅच झाला नाही तर नोटिस येऊ शकते. त्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे आयटीआर फाइल करताना व्यवस्थित भरावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *