महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय. त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बनावट नोटांचा हॉटस्पॉट कुठे आहे? याची माहिती विधानभवनात दिलीय. 2020 पासून बनावट नोटांप्रकरणी किती गुन्हे दाखल करण्यात आलेत? बनावट नोटांचे केंद्रस्थान नेमके कुठे आहे?
तुमच्या खिशातील नोटा बोगस
आपल्या खिशात असणारी नोट बनावट तर नाही ना? अशी भिती अनेकांना सतावत असते. कारण बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय. 500 ची नोट घेताना तर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. अशातच विधानभवनातही बनावट नोटांचा मुद्दा चर्चेत आलाय. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखी उत्तर देत बनावट नोटांचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांसह कारवाईसंदर्भातील माहिती दिलीय…
चलनात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट
2020 पासून राज्यात 273 गुन्हे दाखल
566 जणांना पोलिसांकडून अटक
आतापर्यंत 1.4 कोटींच्या बनावट नोटा जप्त
सरकारने स्वःताच मान्य केली अवैध कारखान्याची बाब
राज्यातील बनावट नोटाचं रॅकेट उद्धवस्त करणं हे गृहखात्यासमोरचं आव्हान
दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्समधील एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करायला गेली. त्यावेळी 500 रुपयांच्या सहा बनावट नोटा बंडलमध्ये आढळल्या. ज्यामुळे नोटा जमा करणाऱ्या व्यक्तीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. त्यामुळे यापुढे कुणीकडूनही नोटा घेताना ती बनावट नाही ना? याची खात्री करून घ्या…अन्यथा खिशाला कात्री आणि तुरुंगवास दिवसरात्री.. अशीच परिस्थिती होईल.