![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केला आहे. त्यानंतर अनेक करदात्यांचे रिफंड जमा होण्यास सुरुवातदेखील झाली आहे. आता ITR-2 आणि ITR3 फॉर्मदेखील अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे आता हे फॉर्म भरणारे करदातेही लवकरच आयटीआर फाइल करु शकतात. ज्याप्रकारे आयटीआर फाइल केला जात आहे. त्याच पद्धतीने आयटीआर रिफंडदेखील खात्यात जमा केला जाणार आहे.
ITR Refund
Q रिफंड कुठे जमा होतो?
Aपगादरावर वर्गापासू ते बिझनेसमॅनपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये रिफंडचे पैसे जमा केले जातात.याआधी रिफंड येण्यत २० दिवस किंवा १ महिना लागायचा. कधी-कधी तांत्रिक अडचणींमुळे ३-४ महिन्यांनीदेखील रिफंड जमा व्हायचा. दरम्यान आता रिफंड फक्त २४ तासात जमा होणार आहे. जास्तीत जास्त ५ ते १० दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. जर तुम्ही लवकर आयटीआर फाइल केला तर रिफंडदेखील लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल.
Qआयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?
Aआयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख यावर्षी वाढवून देण्यात आली आहे. या वर्षी तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करा. जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केला तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करावा लागेल. याचसोबत दंडदेखील भरावा लागेल.
QITR कसा फाइल करावा?
Aआयटीआर फाइल करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
जर तुम्ही टॅक्स रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.
यानंतर ई फाइल टॅबमध्ये जाऊन फाइल आयटीआरवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार इंडिविड्युअल, एचयूफ किंवा इतर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानुसार (ITR 1,ITR 2, ITR 3 )फाइल करायचा आहे.
यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर आयटीआर ई-वेरिफाय करायचे आहे.
यानंतर तुम्हाला लवकरात लवकर रिफंड मिळेल.
Qकोणते कागदपत्र आवश्यक?
A जर तुम्हाला आयटीआर फाइल करायचा असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, फॉर्म 16, डोनेशन रिसिप्ट, स्टॉक ट्रेडिंग स्टेटमेंट, बँक अकाउंट आणि पॅन कार्ड लिंक असेल.
