महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला गो-अराउन्डचा कॉल घ्यावा लागला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना नागपूर विमानतळावर लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला हा निर्णय घ्यावा लागलाय. काल (19 जुलै) सकाळी 7 वाजता नागपूरमध्ये धुक्यांची दाट चादर होती. त्यावेळी नागपूर विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) मुंबई-नागपूर आणि बंगरुळु-नागपूर हे विमाने लँड होणार होती. मात्र लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने विमानाने परत अवकाशात झेपावली. दरम्यान, यावेळी अहमदाबाद विमान अपघाताची आठवण करत प्रवाशांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र दोन्ही विमानांनी 20 मिनिटे हवेत घिरट्या मारल्या आणि दृश्यमान नीट झाल्यानंतर दोन्ही विमानांनी सुखरूप लँडिंग केली. परिणामी प्रवाशांनी ही यावेळी सुटकेचा श्वास घेतला.