महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै ।। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या काही दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे महिना संपण्याआधी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. (Ladki Bahin Yojana News)
जुलैचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)
जुलै महिना संपायला अलघे ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दिवसांत कधीही खात्यात पैसे जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता उशिरा मिळाला होता. त्यामुळे हा जुलैचा हप्तादेखील उशिरा मिळणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. जुलैचे १५०० रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.
या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे (Thesw Women Wont Get Ladki Bahin Yojana Benefits)
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, जर महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनांचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. जर या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.