महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जुलै ।। सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. अनेक लहानमोठ्या गोष्टीचे पेमेंट युपीआयच्या माध्यमातून केले जाते. या पार्श्वभूमीवर यूपीआयच्या वापराबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) एक मोठे पाऊल उचलले आहे. आता यूपीआयचा वापर केवळ पेमेंट करण्यासाठीच नव्हे तर कर्ज घेणे व ती रक्कम खर्च करण्यासाठीही करता येईल. ही नवीन सुविधा 31 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता ग्राहक फोन पे, गूगल पे, पेटीएम यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून आपल्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थांमधून घेतलेल्या कर्जाला डायरेक्ट लिंक करून त्यातून ट्रान्झॅक्शनही करू शकतात.
यूपीआयच्या नवीन नियमात यूजर पी2पी सोबत पी2पीएम व्यवहार करू शकणार आहे. तसेच रोख रक्कमही काढता येणार आहे. त्यासाठी एनपीसीआयने काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. सध्या यूजर एका दिवसांत एक लाखांपर्यंत पेमेंट करु शकणार आहे. तसेच एका दिवसात रोकड 10 हजारांपर्यंत काढता येणार आहे. तसेच पी2पी नियमित व्यवहारांची लिमिट 20 केली आहे. एनपीसीआय वेबसाइटनुसार, यूपीआयवरील प्री-मंजूर क्रेडिट लाइन तुम्हाला तुमच्या बँकेकडून प्री-मंजूर क्रेडिट लाइन मिळवण्याची परवानगी देणार आहे.