महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. ऑगस्ट महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही सुट्ट्यांची यादी पाहून जा. ऑगस्ट महिन्यात अनेक सण असणार आहे. रक्षाबंधन, गणेशोत्सव सण असणार आहे. त्याचसोबत १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असणार आहे. या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद असणार आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास अर्धा महिना म्हणजे १५ दिवसांपेक्षा जास्त सु्ट्ट्या आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी नक्की वाचा.
३ ऑगस्ट (रविवार) – राज्यातील सर्व बँका बंद
८ ऑगस्ट (शुक्रवार)- सिक्कीम, ओडिशामध्ये बँकांना सुट्ट्या
९ ऑगस्ट (शनिवार)- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये रक्षाबंधननिमित्त सुट्टी असणार आहे.
१३ ऑगस्ट (बुधवार)- मणिपुरमध्ये देशभक्ती दिवसनिमित्त सुट्टी
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन)- देशातील सर्व बँकांना सुट्टी
१६ ऑगस्ट (शनिवार)- देशात जन्माष्टमीनिमित्त बँकांना सुट्ट्या
१६ ऑगस्ट (शनिवार)- गुजरात, महाराष्ट्रात पारशी नववर्षानिमित्त सुट्ट्या
२६ ऑगस्ट (मंगळवार)- कर्नाटक, केरळमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी
२७ ऑगस्ट (बुधवार)- आंध्र प्रदेश, गोवा,गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा येथे गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी
२८ ऑगस्ट (गुरुवार)- ओडिशा, पंजाब आणि सिक्कीममध्ये नुआखाईनिमित्त सुट्ट्या
याचसोबत वीकेंडला सुट्टी असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी म्हणजे १० आणि २३ ऑगस्ट रोजी बँका बंद असणार आहे. रविवारी म्हणजे ३, १०, १७, २४ आणि ३१ ऑगस्ट रोजी बँका बंद असणार आहे.
जर तुमचे बँकेत काही काम असेल तर तुम्ही ही यादी पाहा. कॅश काढण्यासाठी, चेक क्लिअरिंग किंवा इतर बँकिंग सर्व्हिस या कामांवर परिणाम होणार आहे. पंरतु ऑनलाइन बँकिंग, एटीएममधून पैसे काढता येणार आहे.