महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। लाडक्या बहिणींच्या पैशांवर आता पुरुषांनी डल्ला मारला आहेत. लाडकी बहीण योजनेचा जवळपास १४ हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. या पुरुषांनी १० महिने योजनेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक महिन्याला १४२९८ पुरुषांनी १५०० रुपये घेतले आहेत.या योजनेत तब्बल २१.४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आता या योजनेतील फसवणूकीला जबाबदार कोण आणि आता या पुरुषांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पुरुषांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींच्या पैशांवर आता पुरुषांनी डल्ला मारला आहे. अजूनही किती पुरुषांनी लाभ घेतला असला माहित नाही. याबाबत आता छाननी सुरु आहे.