महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। 1 ऑगस्ट 2025 पासून देशात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. UPI व्यवहार, SBI क्रेडिट कार्ड फायदे, LPG, CNG आणि PNG चे दर तसेच RBI च्या धोरणात्मक निर्णयांमुळे पैशांशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत.
UPI व्यवहारांसाठी नवीन नियम लागू
1 ऑगस्टपासून NPCI ने UPI व्यवहारांवर काही मर्यादा ठरवल्या आहेत. Paytm, PhonePe, Google Pay सारख्या अॅप्सवरून पैसे पाठवणाऱ्यांनी आणि बॅलन्स चेक करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
एका दिवशी जास्तीत जास्त 50 वेळा बॅलन्स चेक करता येईल.
एका मोबाइल नंबरवर लिंक असलेल्या बँक खात्याचे तपशील एका अॅपवर दिवसाला 25 वेळाच पाहता येतील.
AutoPay व्यवहार आता केवळ ठराविक तीन वेळात होतील: सकाळी 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9:30 नंतर.
NPCI च्या मते, हे बदल अधिक वेगवान सेवा देण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी केले आहेत.
SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी फ्री इन्शुरन्स नाही
जर तुमच्याकडे SBI चे को-ब्रँडेड ELITE किंवा PRIME क्रेडिट कार्ड असेल, तर आता विमान अपघात इन्शुरन्स कव्हर मिळणार नाही.
याआधी ₹50 लाख ते ₹1 कोटींचे कव्हर मिळत होते.
SBI-UCO, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक आणि PSB च्या भागीदारीत असलेल्या कार्ड्सवर हा बदल होणार आहे.
LPG, CNG, PNG आणि ATF दर बदलण्याची शक्यता
1 ऑगस्टला तेल कंपन्या गॅस आणि इंधनाच्या किमतींचा आढावा घेतील.
जुलैमध्ये कमर्शियल LPG सिलिंडर ₹60 नी स्वस्त झाला, पण घरगुती गॅसचे दर स्थिर राहिले होते. या वेळी ग्राहकांना थोडी सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.
एप्रिलपासून CNG आणि PNG दरात बदल झालेला नाही. मुंबईत सध्या CNG ₹79.50 प्रति किलो आणि PNG ₹49 प्रति युनिट आहे.
विमान इंधन (ATF) दरात वाढ झाल्यास हवाई प्रवास महागू शकतो, तर दर कमी झाल्यास भाड्यात कपात होऊ शकते.
RBI ची ऑगस्टमधील बैठक
4 ते 6 ऑगस्टदरम्यान RBI ची मौद्रिक धोरण समितीची (MPC) बैठक होणार आहे. RBI गव्हर्नर संजय मल्लोत्रा व्याजदरात बदलाची घोषणा करू शकतात. या निर्णयाचा थेट परिणाम होम लोन, कार लोन आणि EMI वर होईल.