महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली झालेले घोटाळे समोर आले आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक विभागांचे निधी वळवले आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेमुळे ४ सरकारी योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जवळपास अडीच कोटी महिलांना हे पैसे दिले जातात. त्यामुळे दर महिन्याला सरकारी तिजोरीवर भार वाढत आहेत. याचेच पडसाद आता पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे इतर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे ४ योजनांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वित्त विभागाने माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना सुरुदेखील झाली. याचसोबत अनेक योजनादेखील सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी १.३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते.मात्र, आता राज्याच्या तिजोरीवर ताण वाढत आहेत. त्यामुळेच १०पैकी चार योजनांना ब्रेक लावला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांचीही नोंदणी थांबवण्यात आली आहे. याचसोबत या तरुणांना जून आणि जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे ४ योजनांना ब्रेक लागला आहे.
या ४ योजना बंद (Thesw 4 Schemes Will Discountinue)
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना
१ रुपयात पीक विमा
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना
या चारही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे, याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला जात आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढत आहे. यामुळे या ४ योजना बंद केल्या आहेत, असं सांगितलं जात आहे.