इलेक्ट्रीक वाहनांचं शहर ! महाराष्ट्रातील ‘हे’ शहर EV बाबत देशात ‘येक नंबर’; इथली एकूण EV ची संख्या..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहनं कोणत्या शहारांमध्ये विकली जातात माहितीये का? या शहराचं नाव आणि इथं असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांची संख्या पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल

इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या विक्रीसंदर्भातील ताजी आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक कार विक्री कोणत्या शहरात झाली याची माहितीही समोर आलीये.

महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकत 2 कोटी 41 लाख ई-वाहनांची विक्री करत देशात इलेक्ट्रॉनिक्स वाहन विक्रीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

पुणे शहराने मुंबईला मागे टाकलं आहे. म्हणजेच देशाची आर्थिक राजधानीपेक्षा राज्याच्या संस्कृतिक राजधानीमध्ये अधिक इलेक्ट्रॉनिक वाहनं विकली गेली आहेत.

पुणे शहरामध्ये एकूण 1.13 लाख ई-वाहने विकली आहे. देशात कोणत्याही शहरामध्ये विकली गेलेली ही सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वाहने आहेत. ईलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या मालकीबाबत पुणे शहराने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

राज्याच्या एकूण विक्रीपैकी पुण्याचा एकूण वाटा हा मुंबईपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या 100 कार्सपैकी 16 कार पुण्यात विकल्या जातात. पुण्याचा ईलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीतील वाटा 16.27% इतका आहे.

2021 नंतर ई-वाहन विक्रीत झपाट्याने वाढ झाली असून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक विमानांची निर्मितीही सुरू आहे.

टेस्लाने मुंबईत आपले पहिले स्टोअर उघडले असून, मर्सिडिज पुण्यातील चाकणमध्ये उत्पादन सुरू करण्यास इच्छुक आहे.

मात्र, ई-वाहन उत्पादन हब म्हणून महाराष्ट्र अजूनही हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरूपेक्षा मागे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *