Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना : जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली, पण ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलैच्या हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत. ९ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

९ ऑगस्टला येणार जुलैचा हप्ता (Ladki Bahin Yojana July Month Installment Come On 9th August Raksha bandhan)
लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाच्या दिवशी भेट मिळणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात आहे. दरम्यान, या महिन्यातदेखील हे पैसे उशिराने येत आहे.

ऑगस्टचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana August Month Installment Update)
जुलैचा हप्ता ९ तारखेला येणार आहे. परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऑगस्टचा हप्ता कदाचित महिनाअखेरीस येऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात १५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल.

४२ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ४२ लाख महिलांना बाद करण्यात आले आहे. या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार नाहीत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अनेकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त तर अनेक महिला सरकारी कर्मचारी निघाल्या आहेत. याचसोबत इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *