महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता ज्या पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ११ महिन्यांपासून पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४३० पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांकडून २३.१० कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. त्यासाठीची रक्कम परत करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकता. या योजनेत २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीही अर्ज केले आहेत. तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. एका कुटुंबातील फक्त दोनच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यातील काही महिलांनी सांगितले की, रेशनकार्ड वेगळे आहे. आम्ही योजनेसाठी पात्र आहोत. या सर्व गोष्टींचा पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहे.
दरम्यान, या लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत. या याद्या अंगणवाडी सेविकांकडे पाठवल्या जाणार आहे. त्यामधून प्रत्येक लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे. याचा अहवाल दिल्यानंतर अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार असून त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. परंतु ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
महिला अपात्र होण्याची कारणे (Ladki Bahin Yojana Ineligible Reasons)
एका कुटुंबातील जर दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्या आणि वयोगटात न बसणाऱ्या महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवल्या आहेत. यामधील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. याशिवाय ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झालेला नाही, अशी माहिती रमेश काटकार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर यांनी दिली आहे.
बँकेशी बोलून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवला जाणार
लाडकी बहीण योजनेत तब्बल ४२ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यातील १४ हजार पुरुष आहेत. यातील काही महिलांचे उत्पन्न जास्त आहे, काही महिला सरकारी कर्मचारी आहेत. या अपात्र महिलांना सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. यामधील पुरुषांवर कारवाई होणार आहे. त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. पण शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्जांची पडताळणी झाल्यावर एफआयआर दाखल करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे बँकेशी बोलून या लाभार्थ्यांची रक्कम रोखली जाईल व त्यांना नोटीस देऊन पैसे भरण्यास सांगितले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.