नांदेडकरांनो, इकडे लक्ष द्या ; आज घराबाहेर पडाल तर – पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – निखिल कुर्डूकर – पुणे – दि. १ सप्टेंबर -आपल्याकडे दहा दिवसापासून मुक्कामी आलेल्या गणरायाला निरोप देण्याचा क्षण. या उत्सवानिमित्त गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाला मिरवणुकीद्वारे निरोप देणार आहेत. शहरातून सकाळपासूनच काही भागात मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहर व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. या बदलाचा वापर वाहनधारकांनी व नांदेडकरांनी अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील वाहतुकीकरिता बंद असलेले मार्ग

@जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंत जाण्या-येण्यासाठी बंद.
@ रोज कॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर, वर्कशॉप टी पॉईंट, श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू बंद.
@ राज कॉर्नर ते तरोडा नाक्याकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद.
@ बर्की चौक ते जुना मोंढ्याकडे येण्यासाठी बंद.
@ सिडको- हडको ते जुना मोंढ्याकडे येण्यासाठी बंद.
@ लातूर फाटा येथून सिडको- हडकोकडे जड वाहनांसाठी जाण्या- येण्यासाठी बंद.

वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग

@ बर्की चौकाकडून जुना मोंढ्याकडे येणारी वाहतूक मोहम्मद अली (गणेश टॉकीज) रोड जाणा येण्यासाठी वापर करतील.
@ वजीराबाद चौकाकडून श्रीनगर वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजीराबाद चौक, पोलीस मुख्यालय, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.
@ राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉईन्ट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्रीनिवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्यासाठी वापर करतील.
@ गोवर्धन घाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजी नगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.
@ सिडको- हडकोकडून येणारी वाहतूक साई कमान, गोवर्धन घाट, नवीन पूल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, पिवळी गिरणी ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.
@ लातूर फाटा ते दूध डेअरी, धनेगाव चौक या मार्गाचा अवजड वाहनासाठी वापर करतील.

श्री गणेश विसर्जनानिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक एक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलिस अधिकारी ११, पोलीस निरीक्षक ४१, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार १४६, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, कर्मचारी व महिला पोलीस तीन हजार ३००, आरसीपी प्लाटून पाच, एसआरपीएफ एक कंपनी, पुरुष होमगार्ड २१६ आणि महिला होमगार्ड ८४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *