बातमी कलाक्षेत्राची ; दुसरा पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव १ ते ५ सप्टेंबर २०२० दरम्यान online पार पडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – दि. १ सप्टेंबर – पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने भरवण्यात येणारा या वर्षीचा दुसरा पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२० कोरोना महामारीमुळे व शासनाच्या नियमावलीनुसार online स्वरूपात भरवण्यात येणार असून आज दिनांक १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२०, पर्यंत पिंपरी-चिंचवड आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या ऑफिसिअल युट्यूब चॅनेल वरून प्रसारित होणार आहे.यामध्ये प्रेक्षकांना उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.

https://www.youtube.com/channel/UCLbAaCXU4YDYnIlY8W36sgg?view_as=subscriber

या वर्षी जगभरातील ३० देशामधील आणि भारताच्या विविध राज्यातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ३४० लघु चित्रपट महोत्सवासाठी सहभागी झाले होते . यामध्ये प्रामुख्याने यूएस , स्पेन, इराण , बेल्जियम , मलेशिया , इजिप्त ,स्विर्झर्लंड , व्हीयएतनाम, साऊथकोरिया, इजिप्त,जर्मनी , सिंगापूर बांगलादेश इत्यादी तर भारतातील केरळ , दिल्ली , आंध्रप्रदेश ,प.बंगाल , गोवा, उत्तरप्रदेश ,काश्मिर , मुंबई , पुणे , नगर, सोलापूर, औरंगाबाद, इत्यादी राज्य आणि शहरातील ३४० शॉर्ट फिल्मस पैकी परीक्षकांनी निवडलेल्या ५७ शॉर्ट फिल्मस प्रेक्षकांना online पाहावयास मिळणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून ह्या वर्षी मा. सुदिप्तो आचार्य सर आणि श्री. अभिजित देशपांडे सर हे परीक्षक म्हणून लाभले आहेत. मा. सुदिप्तो आचार्य सर हे मुंबई येथील सुभाष घई यांच्या Whistling Woods International मुंबई या फिल्म इन्स्टिटयू मध्ये प्रॉफेसर तसेच FTII पुणे येथे प्रॉफेसर म्हणून कार्यरत होते, तसचे दुसरे परीक्षक श्री. अभिजित देशपांडे सर हे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (PIFF) परीक्षक होते, तसेच मामि या मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समिती मध्ये होते. ते मुंबई येथील सोमय्या कॉलेज येथे कार्यरत असून चित्रपट संबंधित विविध संस्थांशी निगडित आहेत.

अशी माहिती फेस्टिव्हलचे डायरेक्टर रमेश होलबोले यांनी दिली. यावेळी फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षवर्धन धुतुरे, पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर व दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक सल्लागार श्री.प्रवीणजी तुपे पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *