महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। Central Government: केंद्र सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दिव्यांग श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या परिवहन भत्त्यात वाढ करणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे परिवहन भत्ता डबल होणार आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत सर्व मंत्रालयाना आणि विभागाना निर्देश दिले आहेत. वित्त मंत्रालयाने निवेदन जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ही सुधारणा १५ सप्टेंबर २०२२ रोजी सूचनांमध्ये करण्यात आली आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा २०१६ आणि अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागमध्ये परिभाषित केलेल्या कर्मचारी सुविधेसाठी पात्र असणार आहेत. त्यानुसार, अंधत्व असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे. याशिवाय यात लोकमोटर अपंगत्व, यामध्ये सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा झालेला, बौनेपणा, अॅसिड हल्ल्याचे बळी, स्नायूंचा अंपगत्व, पाठीच्या कण्याचा आजार याचा समावेश करण्यात आला आहे.
कर्णबधीर, मूक आणि श्रवणदोष असलेले कर्मचारी, ऑटिझम स्पेक्टॅम डिसॉर्डर, बौद्धिक अंपगत्व, दिर्घकालीन न्युरोलॉजिकल स्थिती, मल्टीपल स्क्लेरोसिस, पार्किसन्स, बहिरेपणासह अनेक अंपगत्व, या कर्मचाऱ्यांनीही याचा लाभ मिळणार आहे. सरकारचा हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
सातव्या वेतन आयोगात मिळणार भत्ते
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात अनेक भत्ते मिळतात. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण भत्ता यांचा समावेश आहे. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इतर भत्त्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.