महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। आता लवकरच फास्टॅग पास सुरु होणार आहे. ३००० रुपयांत तुम्हाला वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. तुम्हाला कोणताही टोल भरावा लागणार नाही. हा फास्टॅग पास (FASTag Pass) १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या पास तुम्हाला ऑनलाइन काढता येणार आहे. बिगर व्यवसायिक चारचाकी वाहनांना या पासचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, हा पास कुठून आणि कसा काढायचा ते जाणून घ्या.
सध्या टोल नाक्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनाला फास्टॅग असणे अनिवार्य आहे. फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतात. दरम्यान, त्यानंतर आता जो ३००० रुपयांचा फास्टॅग पास सुरु होणार आहे यामुळे लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. या पासमुळे तुम्ही २०० वेळा फ्रिमध्ये प्रवास करु शकतात.
किती पैसे वाचणार?
सध्या टोलनाक्यार गेल्यावर फास्टॅगचे किमान पैसे ७५ रुपये आहेत. जर तुम्ही २४ तासाच्या आत परत आलात तर ३५ रुपये द्यावे लागतात. २०० ट्रीपसाठी तुम्हाला ११००० रुपये मोजावे लागतात.परंतु आता या नवीन फास्टॅग पासमुळे तुम्ही फक्त ३००० रुपयांतच २०० ट्रीप करु शकतात. या नवीन सवलतीमुळे २४ तासांची मर्यादा नसणार आहे.
कोणत्या अॅपवरुन काढता येणार पास? (How To Apply For FASTag Pass On App)
हा नवीन पास तुम्ही सध्याच्या रिचार्ज असलेल्या फास्टॅगवर काढू शकतात. किंवा Rajmarg Yatra – Nhai या अॅपवरुन जाऊन पास करु शकतात. यामध्ये अॅप डाउनलोड करावा. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर पैसे भरावे आणि ३००० रुपयांचा पास मिळवावा. हा पास दाखवल्यावर तुम्हाला मोफत प्रवास करता येणार आहे.