महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयनं गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवहाराशी संबंधिक अनेत नियमांमध्ये गरजेनुसार बदल केले. तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांना अनुसरून अनेकदा हे बदल करण्यात आले, तर काही वेळा खातेधारकांचं हित केंद्रस्थानी ठेवत हे धोरणात्मक बदल देशातील सर्वोच्च बँक संस्थेकडून निर्देशित करण्यात आले. अशाच एका नव्या नियमाची भर आता सध्याच्या नियमांमध्ये पडणार असून, त्याचा थेट परिणाम सामान्यांवरही होताना दिसणार आहे.
आरबीआनं नेमका कोणता नियम बदलला?
उपलब्ध माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम अर्थात सीटीएस (CTS) ला नव्या कंटीन्यूअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रिअलायझेशनमध्ये रुपांतरित करण्याची घोषणा आरबीआयनं केली आहे. चेक क्लिअरन्स अर्थात धनादेश वटवण्याची प्रक्रिया आणखी वेगनवान करण्यासाठीच आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार दोन टप्प्यांमध्ये हे बदल आणि संपूर्ण प्रणाली लागू होणार असून, त्याचा पहिला टप्पा 4 ऑक्टोबर 2025 ते 3 जानेवारी 2026 दरम्यान लागू असेल. तर, दुसरा टप्पा 3 जानेवारीनंतरच सुरू होईल.
काही तासांमध्येच उरकणार संपूर्ण प्रक्रिया!
RBI च्या या नव्या प्रणालीनुसार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक सादरीकरण करण्यात येणार असून, यामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत बँकेत चेक जमा करणं अपेक्षित राहणार असून, चेक मिळाल्यानंतर तो तातडीनं क्लिअरिंग हाऊसला पाठवण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. यानंतर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बँकांचं कॉन्फर्मेशन सेशन राहणार असून, यामध्ये रक्कम देणाऱ्या बँकेकडून त्या धनादेशावर सकारात्मक किंवा नकारात्मक Confirmation अपेक्षित असेल.
लक्षात घ्या…!
महत्त्वाची आणि लक्षात राहण्याजोगी बाब म्हणजे, प्रत्येक चेकला एक निर्धारित ‘आयटम एक्सपायरी टाईम’ असणार असून, त्याचदरम्यान त्यांना कॉन्मफर्मेशन मिळणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगावं तर, टेक मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांच्या आत त्याला बँकांकडून मंजुरी द्यावी लागेल.
म्हणजे, जर सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान मिळालेल्या चेकसाठी बँकेला दुपारी 2 वाजेपर्यंत उत्तर द्यावं लागेल. वेळेत उत्तर न दिल्यास चेक आपोआप मंजूर मानून सेटलमेंटमध्ये पुढे नेला जाईल. सेटलमेंट झाल्यावर बँकेने ग्राहकाला पैसे लगेच, कमाल एका तासात देणं अपेक्षित असेल.