महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा खुशखबर देऊ शकते.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होऊ शकते. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये २ बेसिस पॉइंट दर कपात हा आरबीआयसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
दरम्यान, याबाबत अनेक तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याची शक्यता आहे.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून तीन दिवस पतधोरण बैठक होणार आहे. यामध्ये धोरणात्मक दरांवर चर्चा होणार आहे. जागतिक बाजारातील तणाव, अमेरिकेने निर्यातीवर लावलेल्या ५० टक्के करावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अंतिम निर्णय हा १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात
या वर्षी आरबीआयने सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण १०० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. त्यानंतर यावेळी रेपो रेट कपात होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. किरकोळ महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अमेरिकेतली कर आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत रिसर्च केले आहे. येत्या बैठकीत रेपो रेट २५ बेसिस पॉइंटने कपात होण्यासाठी वाव आहे. पुढील वर्षात किरकोळ महागाई स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरबीआय निर्णय घेऊ शकतो, असं सांगण्यात आले आहेत.