Hong Kong Airport crash: हाँगकाँग विमानतळावर भीषण अपघात; लँडिंगवेळी विमान समुद्रात कोसळले, पाहा Video

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० ऑक्टोबर | हाँगकाँग : चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग विमानतळावर आज पहाटे एक मोठा विमान अपघात झाला. एक मालवाहू विमान हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून थेट समुद्रात गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर विमानात असलेले चार क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर काढले गेले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात पहाटे चार वाजता हाँगकाँग विमानतळाच्या उत्तर धावपट्टीवर झाला. बोईंग 747 मालवाहू विमान तुर्कस्तानच्या एसीटी एअरलाईन्सद्वारे चालवले जात होते. दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून हाँगकाँगला आज पाहाटे पोहोचले होते. मात्र धावपट्टीवर उतरताना घसरून समुद्रात कोसळले. विमानाचा मागील भाग समुद्रात बुडाला, तर पुढील भाग आणि नियंत्रण कक्ष पाण्यावर दिसत होते. अपघातानंतर ही धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. उर्वरित दोन धावपट्ट्या सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *