![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचे मेट्रो ३ प्रोजेक्ट सुरु होणार आहे. पुणे मेट्रो लाइन ३ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात पुणेकरांना खुशखबर मिळू शकते.
चार नवीन पार्किंग
पुणे महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर बालेवाडीत चार पार्किंग देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली वाहने पार्क करता येणार आहे. यामुळे मेट्रोने त्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.
बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार असू, त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे. हिंजवडी- शिवाजीनगर या मेट्रोचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आहे. दोन ते तीन महिन्यात हिंजवडी ते बाणेर मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे.त्यानंतर वर्षभरात हा संपूर्ण मार्ग सुरू होणार आहे.
हिंजवडीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा
बाणेर, बालेवाडी या भागातून हिंजवडी आयटी पार्क मध्य नोकरीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच हिंजवडीच्या रस्त्यावर खूप जास्त वाहतूक कोंडी होती. कर्मचाऱ्यांना तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते.यामुळे ऑफिसला पोहचायला उशिर होतो. याचसोबत हिंजवडीच्या रस्त्याची खूप जास्त दुरावस्था आहे. यामुळे मेट्रो लाइन ३ हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मेट्रो लाइनला प्रवासी चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.
दिवाळीत पुणे मेट्रोला फटका
दिवाळीत पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी संख्या घटली आहे. आधी लाखो लोक प्रवास करायचे आता ही संख्या काही हजारांवर आली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त ५२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळीत पुण्यात राहणारे कर्मचारी आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. आधी २ लाख ३६ हजार प्रवासी दररोज प्रवास करायचे आता ही संख्या सरासरी १२ हजारांवर आली आहे.
