![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ६ डिसेंबर २०२५ | सोन्याचे दर गेल्या काही दिवसांत अक्षरशः डोंगर चढत आहेत. गगनाला भिडणाऱ्या भावांमुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत असतानाच, शनिवारी सकाळीच सराफा बाजारातून पुन्हा एक मोठा बदल समोर आला आहे. सोन्याच्या किंमतीत तेजी कायम राहत मोठी वाढ झाली असून, चांदीच्या किमतीतही उलटापालट पाहायला मिळाली आहे.
ग्राहकांना धडकी भरवणारा ताजा भाव पाहू या…
सोन्याचा ‘आजचा भाव’ : 24 कॅरेटचा टप्पा परत वर
बुलियन मार्केटनुसार,
10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं – ₹1,30,520
10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं – ₹1,19,643
1 किलो चांदी – ₹1,82,830
10 ग्रॅम चांदी – ₹1,828
उत्पादन शुल्क, मेकिंग चार्ज आणि स्थानिक करांमुळे दागिन्यांच्या किमती शहरागणिक बदलू शकतात. म्हणूनच तुमच्या शहरातील नेमका भाव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर
शहर 22 कॅरेट सोनं (10g) 24 कॅरेट सोनं (10g)
मुंबई ₹1,19,423 ₹1,30,280
पुणे ₹1,19,423 ₹1,30,280
नागपूर ₹1,19,423 ₹1,30,280
नाशिक ₹1,19,423 ₹1,30,280
सर्वच प्रमुख शहरांत आज दर स्थिर पण उंच आहेत. लग्नसराई सुरू असताना ही वाढ खरेदीदारांसाठी नक्कीच ‘महाग’ ठरू शकते.
सूचना
(हे दर सूचक असून स्थानिक ज्वेलरकडे मिळणाऱ्या अंतिम किमतीत कर व मेकिंग चार्जसमवेत लहान-मोठे फरक असू शकतात.)
