✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून यंदाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसल्याने नवीनच स्थिती निर्माण झाली आहे. कामकाज पत्रिकेतही विरोधी पक्षनेता निवडीचा उल्लेख नसल्याने अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधान परिषदेकरिता काँग्रेसकडून सतेज पाटील, तर विधानसभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) कडून भास्कर जाधव यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत नियुक्ती झालेली नाही.
सात दिवसांचे अधिवेशन, सुट्टीच्या दिवशीही कामकाज हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर सात दिवस चालणार आहे. यंदा शनिवार–रविवारही कामकाज सुरू राहणार आहे.
पहिल्या दिवशी:
पुरवणी मागण्या
शासकीय कामकाज
शोकप्रस्ताव
यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, पुरवणी मागण्यांमध्ये काही नवीन घोषणा होतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षनेता निवडीवर मुख्यमंत्र्यांचे विधान
विरोधी पक्षनेता नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले— “विरोधी पक्ष नेत्यांची निवड ही अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीतली बाब आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. आमचा कुठलाही आग्रह नाही.”
१८ विधेयके, विदर्भ–मराठवाड्यावर लक्ष
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की: अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार आहेत विदर्भ व मराठवाड्याशी संबंधित प्रश्नांवर विशेष चर्चा होणार नागपूर अधिवेशनात दररोज १० तासांपेक्षा जास्त कामकाज करण्याचे सरकारचे नियोजनतसेच दावोस आणि इतर मंचांवर झालेले गुंतवणूक करार प्रत्यक्षात येत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारचा चहापान कार्यक्रम आणि बहिष्कार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित महाविकास आघाडीचा बहिष्कार विरोधकांनी केलेल्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
