हर्षित राणावर इतका भर? गौतम गंभीरने अखेर उघड केलं ‘खरं कारण’ — “मला त्याला तयार करायचंय…”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर हर्षित राणाला वारंवार संघात घेतो असा आरोप नेहमीच होतो. कोलकाता नाईट रायडर्समध्ये दोघांची पहिली जोडी जमली आणि 2024 मध्ये KKR ला आयपीएल विजेतेपदही मिळालं. काही महिन्यांतच गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक झाला आणि हर्षितला सर्व फॉरमॅटमध्ये संधी मिळू लागली. यामुळेच “गंभीर पक्षपाती आहे” अशी चर्चा रंगली.

पण दक्षिण आफ्रिका मालिकेच्या शेवटी गौतम गंभीरने स्वतःच खरी कारणं स्पष्ट केली.

“हर्षित आठव्या क्रमांकासाठी परफेक्ट” — गंभीरचा ठाम दावा गंभीरच्या मते भारतीय संघात अनेक वर्षांपासून सर्वात मोठी उणीव म्हणजे — आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा वेगवान गोलंदाज.आणि हर्षित राणा त्या जागेसाठी अगदी फिट असल्याचं गंभीरचं मत. “आम्हाला हर्षितसारखा खेळाडू हवा आहे — जो ८व्या क्रमांकावर धावा करेल, आणि ४ योग्य जलदगती गोलंदाजांसह संघाचं संतुलन राखेल.” — गंभीर गंभीरने स्पष्ट केलं की राणा हा 2027 वर्ल्डकपचा महत्त्वाचा अष्टपैलू ठरावा यासाठी त्याची खास तयारी सुरु आहे.

“बुमराह परत आलाय, आणि या तिघांनी जे केलं ते अविश्वसनीय” — गंभीरचा विश्वासदक्षिण आफ्रिका मालिकेत:अर्शदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा हर्षित राणा
या तिघांनी जबरदस्त प्रदर्शन केल्याचं गंभीरने कौतुक केलं. “ते तिघे ODI फॉरमॅटमध्ये १५ पेक्षा कमी सामने खेळलेत. तरी जी कामगिरी केली, ती कमाल आहे.” जसप्रीत बुमराह परतल्याने भारतीय वेगवान गोलंदाजी लाईनअप आणखी मजबूत होत असल्याचं गंभीरने नमूद केलं.

अनुभवी शमी–सिराज बाहेर, पण गंभीरचा प्लॅन स्पष्ट!
गंभीरने कबूल केलं की एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अनुभव कमी असल्यानेच हर्षित, अर्शदीप आणि प्रसिद्ध यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. “जर हर्षितला आपण पक्का ८वा क्रमांकाचा अष्टपैलू बनवू शकलो, तर भारताला आदर्श संतुलन मिळेल.”

हर्षितची प्रथम श्रेणी कामगिरीही भक्कम आहे — 14 सामन्यांत एक शतक, दोन अर्धशतके आणि 31.18 चा सरासरीचा स्कोर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *