![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि.२३ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आवक चांगली राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचा अंदाज योग्य असेल. कामाच्या व्यापात गढून जाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
सामाजिक कामात अग्रेसर राहाल. मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल. स्वपराक्रमावर अधिक भर द्याल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. धाडसीपणात वाढ होईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
धार्मिक कामात खर्च कराल. पारमार्थिक गोष्टींकडे ओढा वाढेल. गप्पांमध्ये रमाल. फसवणुकीपासून सावधान. मत्सराला बळी पडू नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
शारीरिक दगदग वाढू शकते. नाराजीला मनात थारा देवू नये. कामातील अडचणी दूर कराव्यात. निराशा दूर करावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनाजोगे काम करता येईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नातेवाईकांची मदत मिळेल. चांगली कमाई होईल. लाभाकडे लक्ष द्यावे. वयस्कर मित्र भेटतील. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
दलालीच्या कामातून फायदा संभवतो. उपासनेला बळ मिळेल. वायदा पूर्ण करावा. मनातील इच्छा पूर्ण होतील. खटपटीला यश येईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कामाचा दर्जा सुधारेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. संकोच करू नये. कामात जाणीवपूर्वक बदल कराल. इर्षेने कामे हाती घ्याल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
लिखाणातून फायदा संभवतो. काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. स्वबळावर विश्वास ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
पत्नीकडून धनलाभ संभवतो. भागीदारीतून पैसा मिळेल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )
गैरसमजाला मनात थारा देवू नये. भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद टिकवून ठेवावा. राग आवरता घ्यावा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
मानसिक स्थैर्य जपावे. विचारांच्या गर्दीत वाहून जावू नये. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. किरकोळ दुखापतींपासून सावध राहावे. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे.