देशातील सर्वात मोठी एअरलाइन ‘इंडिगो’ का कोसळली?; नवे नियम, कमी कर्मचारी मॉडेल आणि व्यवस्थापनातील गोंधळाचा मोठा स्फोट!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | देशातील सर्वांत मोठी एअरलाइन असलेल्या इंडिगोला तिच्या इतिहासातील सर्वात मोठं ऑपरेशनल संकट झेलावं लागत आहे. शेकडो उड्डाणं रद्द, विमानतळांवर गोंधळ, प्रवाशांचा प्रचंड संताप—या सर्वांमागचं मूळ कारण आहे DGCAचे नवे नियम आणि इंडिगोचं कमी कर्मचारी असलेलं मॉडेल. दोन्हींचा तडाखा एकाच वेळी बसल्याने ‘स्काय-ब्ल्यू’ रंग ऐनवेळी फिक्का पडला आहे.

नवीन नियम, मोठी काटछाट! पायलटांना ४८ तास विश्रांती, रात्रीच्या उड्डाणांवर कडक बंधन
DGCAने फ्लाइट ड्यूटी टाइम मर्यादेत कडक बदल केले.

पायलटांच्या आठवड्याच्या विश्रांतीत ३६ वरून ४८ तासांची वाढ
सलग रात्रीची ड्यूटी फक्त दोनपर्यंत मर्यादित
रात्रीच्या उड्डाणांची संख्या घट

आता या बदलांमुळे एकाच पायलटच्या हातावर चालणारी अनेक उड्डाणं बंद पडली. वर्षानुवर्षं ‘कमी पायलट, जास्त उड्डाण’ या मॉडेलवर धावणारी इंडिगो नव्या नियमांमुळे गडबडली.

इंडिगोचं स्पष्टीकरण: “पायलट आहेत… पण बफर नाही!” — एअरलाइनचा ‘कठीण’ कबुलीजबाब

एअरलाइनचे दावे:
कॅप्टन पुरेसे आहेत, पण ‘बफर’ कमी
हायरिंग बंद नाही
व्यवस्थापकीय त्रुटी दुरुस्त सुरू
Route Cause Analysis सुरू

पण आकडे चित्र स्पष्ट करून टाकतात —
एअरबस A320 विमानांसाठी इंडिगोला २,४२२ कॅप्टन हवे होते, पण उपलब्ध फक्त २,३५७. शिवाय फर्स्ट ऑफिसर्स सुद्धा कमी.त्यातच रात्रीच्या उड्डाणांवर आधारित ‘उच्च वापर मॉडेल’ नव्या नियमांमुळे अक्षरशः कोसळलं.

परिणाम?
२ डिसेंबरपासून उड्डाणांची झपाट्याने रद्दबातल! केवळ रविवारीच २,३०० पैकी तब्बल ६५० फ्लाइट्स रद्द.

देशभरात गोंधळ: लांब रांगा, हरवलेलं सामान, चुकलेली लग्नं आणि नोकरीच्या मुलाखती! दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद—याठिकाणी चित्र एकच:
तणाव, थांबलेली फ्लाइट्स आणि त्रासलेले प्रवासी. काहींची महत्त्वाची बैठक, काहींचं लग्न, तर काहींच्या नोकरीच्या मुलाखती—सगळं हुकलं.

इंडिगोने कारणं सांगितली:
तांत्रिक बिघाड
खराब हवामान
हिवाळी वेळापत्रक
नवीन क्रू नियम
पण प्रत्यक्षात सर्वांचा बाण एकाच दिशेने—मानवी संसाधनांची मोठी तूट!

सीईओ पीटर एल्बर्सची माफी आणि आश्वासन ५ डिसेंबरला इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स पुढे आले आणि माफी मागितली.
ते म्हणाले— “१० ते १५ डिसेंबरदरम्यान सर्व सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू.” पण प्रवाशांच्या मनातील राग अजूनही शमलेला नाही.

भाड्यांचा स्फोट ! दिल्ली–बंगळुरू फ्लाइट ४०,००० च्या वर
उड्डाणं रद्द, प्रवाशांची गर्दी आणि मागणी वाढ—यामुळे एअरफेअरने आकाश गाठलं! दिल्ली–बंगळुरूचे स्वस्तातले भाडेही ₹४०,००० पार! सरकारने ६ डिसेंबरला भाडे मर्यादा लावल्या, पण तोपर्यंत हजारो प्रवाशांची किमान खिशाला झळ बसलीच.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *