Gold Rate Today : सोने पुन्हा चढले! चांदीनेही मारला झेप; तुमच्या शहरातील आजचे ताजे दर जाणा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | सोने–चांदीच्या बाजारात आज पुन्हा उसळी पाहायला मिळाली. दररोज बदलणाऱ्या सोन्या–चांदीच्या भावाने ग्राहकांचे गणितच बदलून टाकले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी सकाळपर्यंत प्रति १० ग्रॅम तब्बल ₹१,२८,२५७ वर पोहोचला आहे. चांदीनेही धाव घेत प्रति किलो ₹१,७९,०८८ हा उच्चांक स्पर्श केला आहे. दरात झालेल्या या वाढीनं खरेदीदारांनी पुन्हा थोडा धीर धरावा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक बाजारपेठाही या वाढीपासून सुटली नाही. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,३२,६०० वर स्थिरावला आहे, तर चांदी प्रति किलो ₹१,८५,००० झाली आहे. MCX वरील वायदा बाजारातही सोन्याने ₹१,३०,६३८ तर चांदीने ₹१,८२,६०० चा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डची किंमत ०.१८% वाढून $४,२०५.२६ प्रति औंस झाली—म्हणजे किंमत वाढ जागतिक पातळीवरही सुरूच आहे.

सोन्याच्या विविध कॅरेटनुसार दर पाहिले तर ग्राहकांची पिशवी हलकी करणारे आकडे समोर येतात. २४ कॅरेट सोने ₹१,२८,२५७, २२ कॅरेट ₹१,१७,४८३, तर १८ कॅरेट दर ₹९६,१९३ प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. चांदीनेही दमदार झेप घेत ९९९ शुद्धतेच्या दरासाठी ₹१,७९,०८८ असा उच्चांक गाठला आहे. या सततच्या चढउतारांनी गुंतवणूकदार मात्र सावध पावले टाकताना दिसत आहेत.

कालच्या तुलनेत बाजाराचे चित्र पूर्णपणे उलट आहे. सोमवारी सोन्याचे दर ३०० रुपयांनी घसरत होते; आज मात्र त्यात उसळी दिसली. उलट, चांदीने कालही वाढ दाखवली आणि आजही त्या प्रवाहाला चालना मिळाली आहे. सलग दोन दिवसांपासून शक्तिशाली वाढ दाखवणारी चांदी आणि वरखाली होत असलेले सोनं—या दोन्हींच्या हालचालींनी सोन्या-चांदीचे बाजार पुन्हा एकदा तापले आहेत. पुढील काही दिवसात भाव कोणत्या दिशेने जातील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *