WhatsApp Call Recording : खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅप कॉल आता रेकॉर्डही होणार… फक्त एका क्लिकवर!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त मेसेजेसपुरतं अॅप राहिलेलं नाही. ऑफिस मिटिंगपासून घरातील गप्पांपर्यंत सगळं काही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलवरच होतं. पण एक मोठी कुरकुर कायम—कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय नाही! मेटा म्हणतं, “आमचे कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड, म्हणून बिल्टइन रेकॉर्डिंग शक्य नाही.” पण वास्तव सांगू? या कारणामुळे लोक कुठलेतरी थर्ड-पार्टी अॅप्स वापरतात… आणि मग सुरू होतो हॅकिंग, डेटा चोरीचा धोका. मात्र, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आता एकदम सोपी, सुरक्षित आणि घरबसल्या होणारी ट्रिक उपलब्ध आहे—फोनचे इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डिंग!

अँड्रॉइड वापरकर्त्यांनी काहीच करायचं नाही—फक्त स्क्रीन रेकॉर्डर चालू करा, कॉल स्पीकरवर घ्या आणि बोला. स्क्रीन + आवाज दोन्ही सहज रेकॉर्ड होतात. एकही अतिरिक्त अॅप नाही, कोणतंही धोकादायक परवानगी नाही. आजच्या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डर हा एकदम विश्वासार्ह पर्याय ठरतोय. शिवाय कॉल संपताच फाईल थेट गॅलरीत सेव्ह होते—नो टेन्शन, नो रिस्क. फक्त स्पीकर मोड चालू ठेवला, तर आवाज उत्तम दर्जात कॅप्चर होतो.

कसं करायचं WhatsApp Call Recording?
मोबाईलच्या स्क्रीनवरून खाली स्वाइप करून Quick Settings उघडा

Screen Record / Screen Recorder शोधा

रेकॉर्डिंग सुरू करा

WhatsApp कॉल स्पीकरवर घ्या आणि बोलायला सुरुवात करा

कॉल संपला की व्हिडिओ गॅलरीत सेव्ह!

परंतु… आयफोन वापरकर्त्यांसाठी ही बातमी फारशी आनंदाची नाही. अॅपलचे कडक प्रायव्हसी नियम आणि iOS ची रचना यामुळे स्क्रीन रेकॉर्डर व्हॉट्सअ‍ॅपचा आवाज कॅप्चरच करू शकत नाही. कोणतेही थर्ड-पार्टी अॅपही काम करत नाहीत. त्यामुळे iPhone वर WhatsApp कॉल रेकॉर्ड करणे आजच्या तारखेला जवळपास अशक्य.

आणि हो—एक अंतिम पण अत्यंत महत्त्वाचा इशारा! कॉल रेकॉर्डिंग करण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीची परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. भारतासह अनेक देशांत परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करणे गुन्हा ठरतो. म्हणून ही सुविधा फक्त कायदेशीर, पारदर्शक आणि नैतिक कारणांसाठीच वापरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *