नेहरूंची सावली आणि मोदींचा सवाल; प्रियांकांचा पलटवार : “जनतेने पाठवलं ते काम करा आधी!”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | लोकसभेत ‘वंदे मातरम’च्या चर्चेने तापलेल्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंवर नव्या आरोपांची फटकेबाजी केली आणि काँग्रेसवर जुनी वही उघडली. “नेहरूंनी मुस्लिम लीगपुढे वाकून ‘वंदे मातरम’चं कापाकापी केली,” असं ते म्हणाले, पण प्रियांका गांधी-वाड्रा यांनी या आरोपांना सरळसरळ अपूर्ण माहितीचं राजकारण ठरवत मोदींवरच ताशेरे ओढले. “तुम्ही निवडक तथ्यं सांगता आणि बाकीचा इतिहास मुद्दाम सोडता,” असा त्यांचा थेट हल्ला.

“जेव्हा अर्थव्यवस्था, बेरोजगारी, प्रदूषण यावर बोलायचं असतं… तेव्हा अचानक नेहरू आठवतात,” असा टोला प्रियांकांनी लगावला. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर सरकार लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवतंय, असा त्यांचा आरोप. “मोदी ज्या वर्षे पंतप्रधानपदावर आहेत, त्या वर्षांइतका काळ नेहरू तुरुंगात होते,” हा संवाद तर सभागृहातला माहोलच बदलून गेला.

राष्ट्रीय गीतावर बोलताना प्रियांका म्हणाल्या, “वंदे मातरम म्हटलं की अंगात देशभक्ती संचारते. ब्रिटिशसुद्धा ज्यासमोर झुकले, त्या गाण्यावरून आज राजकारण? हे स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना कमी लेखणं आहे.” गाण्याच्या इतिहासातील महत्त्वाचे संदर्भ, नेहरू- नेताजी बोस यांचे पत्रव्यवहार, टागोर यांचा उल्लेख… हे सगळं प्रियांकांनी दाखवत मोदींचे दावे “तथ्यांशिवाय राजकीय उडवाउडवी” असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधानांच्या भाषणाचा निशाणा ओळखत प्रियांकांनी एकच थेट सल्ला दिला — “नेहरूंवर बोला, त्यांची टीका करा… आम्हाला हरकत नाही. पण लोकांनी तुम्हाला इथे कशासाठी पाठवलंय ते विसरू नका. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रदूषण यावरही बोला.” म्हणजे — नेहरूंचा रिमोट धरून देश चालत नाही; जनतेचा आवाज ऐकायला लागतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *