लाखो जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारच्या आशेवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई : कोरोना काळापुर्वी त्यात तब्बल दिड लाखांहून अधिक कर्मचारी आणि प्रशिक्षक कार्यरत होते. कित्येक तरुणांनी तर प्रशिक्षणाचा कोर्स पुर्ण करत या व्यवसायाला आपले उदरनिर्वाहाचे साधन बनवले होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसायच ठप्प पडल्याने यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिम मालक आणि कर्मचारी सरकार लवकरच परवानगी देईल, या आशेवर जगत आहेत.

कालांतरांने श्रीमंतांबरोबरच मध्यमवर्गींयांचाही जीमकडे कल वाढू लागला व असंख्य जिमचा उदय झाला. आता दर वर्षी व्यवसाय म्हणून नवनवीन जिम उदयाला येत आहेत. कित्येक तरुणांनी व्यायामाचा प्रशिक्षण कोर्स करून या व्यवसायाला आपले उपजीविकेचे साधन बनविले. मात्र, जगभर कोरोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर इतर क्षेत्रांसोबतच जीम व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला.

लॉकडाऊनमूळे अचानक काम ठप्प झाल्याने या जीममधील कामगारांना विनापगार सहा महिने घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. काही मालकांनी या काळातही माणुसकीच्या दृष्टीने आपल्या कामगारांना पगार दिला आहे. मात्र त्याचा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. तर, बहुसंख्य कामगारांना या काळात पगारच देण्यात आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *