![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ डिसेंबर २०२५ | सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत असतानाच, आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून चांदीच्या दरातही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३६,४५० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२५,०७९ रुपये नोंदवण्यात आला आहे. याचबरोबर १ किलो चांदीचा दर २,३९,१४० रुपये असून १० ग्रॅम चांदीसाठी २,३९१ रुपये मोजावे लागत आहेत.
उत्पादन शुल्क, राज्य कर तसेच मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीवेळी दरांमध्ये फरक जाणवू शकतो.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
मुंबई:
२२ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,२४,८५० रुपये
२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,३६,२०० रुपये
पुणे:
२२ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,२४,८५० रुपये
२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,३६,२०० रुपये
नागपूर:
२२ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,२४,८५० रुपये
२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,३६,२०० रुपये
नाशिक:
२२ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,२४,८५० रुपये
२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम १,३६,२०० रुपये
(वरील दर सूचक असून त्यामध्ये जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक सराफा व्यापाऱ्याशी संपर्क साधावा.)