महाराष्ट्रात शाळा उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई – केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही राजी होणार नाहीत, निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु होता कामा नये. गेल्या वर्षीचे वेतने तर अनुदान परत गेल्याने सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी ते तातडीने देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.दिवाळी 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असल्याने आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *