महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – पिंपरी चिंचवड -: पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वस्थ योजना आवश्यक असूनही कायम ठेवण्यात यावी जो पर्यंत कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत विमा पॉलिसी बाबत विचार करण्यात येऊ नये अशी सूचना पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली आहे.
सध्या परिस्थिती ही कोरोना मुळे अतिशय गंभीर असून विमा पॉलिसी वर विनाकारण खर्च करणे उचित ठरणार नाही विमा पॉलिसी मध्ये कर्मचाऱ्यांसाठी त्यात काही आजारांचा समावेश नसल्याची तक्रार कर्मचारी महासंघाने केली आहे त्यामुळे विमा पॉलिसी निर्णय कर्मचाऱ्यांच्या इच्छेच्या विरोधात जात आहे त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी योजना कायम सुरू ठेवावी अशी सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे
