![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षभरात 19 कि.मी. प्रतितासावरून 22 कि.मी. प्रतितासापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. पुढील काळात शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग डिसेंबरअखेर 26 कि.मी. प्रतितासापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, त्याचवेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सोमय मुंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. अमितेश कुमार म्हणाले, शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची शास्त्रशुद्ध ओळख करून तेथे विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी एआय आधारित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे सिग्नल नियोजन अधिक अचूक होऊन वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.
वेग वाढवणे आणि अपघात कमी करणे, ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणार आहोत,” असे आयुक्तांनी ठामपणे नमूद केले. ट्रिपल सीट दुचाकी चालवण्यास निर्बंध आणण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नियमभंग करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त “सडक सुरक्षा-जीवन रक्षा” हा संदेश देत नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सोमय मुंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. अमितेश कुमार म्हणाले, शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची शास्त्रशुद्ध ओळख करून तेथे विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी एआय आधारित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे सिग्नल नियोजन अधिक अचूक होऊन वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे करता येईल. वेग वाढवणे आणि अपघात कमी करणे, ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणार आहोत,” असे आयुक्तांनी ठामपणे नमूद केले. ट्रिपल सीट दुचाकी चालवण्यास निर्बंध आणण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नियमभंग करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त “सडक सुरक्षा-जीवन रक्षा” हा संदेश देत नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, गेल्या काही महिन्यांत 7 हजार 500 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई केली आहे. यापुढे अशा चालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच सार्वजनिक स्वरूपात ’सत्कार’ केला जाईल, असे त्यांनी उपरोधिक शब्दांत सांगितले. तसेच, संबंधितांना 15 दिवसांच्या प्रशिक्षण कोर्सबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुन्हेगारांनी मर्यादेत राहावे
गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको. गुन्हेगारांनी मर्यादेत राहावे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण खपवून घेणार नाही. कायद्यात राहिले तर मान्य, नाही तर पोलिस त्यांना ठोकतील. शहराची सुरक्षितता आणि सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. शहरात सध्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेले काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच काही गुन्हेगार जर निवडणुकीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत असतील तर त्यांच्यावर देखील आमचे लक्ष आहे, असे देखील अमितेश कुमार म्हणाले.
वाहन मालकांवरही जबाबदारी
अपघातास मोठे मिक्सर व जडवाहने कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरएमसी प्लाण्टमधून वाहन निघताना गाडीचालकाने मद्यप्राषण केले तर नाही ना, हे पाहणे त्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे अशा प्रकल्पांच्या मालकांवरही जबाबदारी निश्चित करा, अशा सूचनाही पोलिस आयुक्तांनी यावेळी दिल्या.
विमाननगर येथील सिम्बॉयोसिस सभागृहात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानचे आयोजन केले होते. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत चोरी गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.