जनतेने टॅक्सरुपात भरलेल्या पैशातून कंगनाला वाय प्लस सुरक्षा का ? – उर्मिला मातोंडकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई -अभिनेत्री कंगना राणावतला वाय प्लस सुरक्षा दिल्याच्या मुद्द्यावरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं केंद्र सरकारवर टीका केली आहे. जनतेने टॅक्सरुपात भरलेल्या पैशातून कंगना राणावतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय, असा सवाल तिने विचारला आहे.

एबीपी माझाशी बोलताना उर्मिलाने कंगनावर टीकाही केलीय.

“काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय आहे. बॉलीवूडमध्ये पैसा आणि प्रसिद्धी मिळवली, त्याच बॉलीवूडला बदनाम करण्याचं काम कंगना करत आहे,” असंही उर्मिला म्हणाली

‘जेव्हा रियाला म्हटलं जातं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहायला विसरू नकोस’
‘रियाचे बिकिनीतले फोटो टाकल्याने किंवा तिला विषकन्या म्हटल्याने न्याय मिळणार का?’
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल जया बच्चन ट्रोल होण्यासारखं काय बोलल्या?
“कंगनाला दिलेल्या वाय प्लस सुरक्षाव्यवस्थेचे पैसे कोण देतो?

‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून सामान्य नागरिक टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाहीत. त्या करदात्यांच्या पैशातून कंगनाला सुरक्षा दिली गेली, ती काय म्हणून दिली गेली,” असा प्रश्न उर्मिलाने विचारलाय.

दरम्यान, मुंबई महापालिकेची आपल्या पाली हिलमधील बंगल्यावर केलेली कारवाई अवैध असून त्याप्रकरणी त्यांनी दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कंगना राणावतने केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *