महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई -राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना आणि झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरून वाद होताना दिसतो. कोरोना काळातही सत्ताधारी शिवसेनेसह इतर घटक पक्षातून त्यांच्यावर काही वेळा टीकाही झाल्याचं पाहायला मिळालं.याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भाई जगताप यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
राजभवनाला RSS शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरतं नामकरण करावं का? असा प्रश्न भाई जगताप यांनी ट्वीट करून विचारला आहे.
https://twitter.com/BhaiJagtap1/status/1305737956024397824?s=20
नुकतंच कंगना राणावतने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावरूनही त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
शिवाय बारा आमदारांची नियुक्ती तसंच अंतिम परीक्षा रद्द करण्याबाबत्या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं होतं.