Horoscope Today दि. २२ मार्च २०२६ ; आज प्रवासात आरोग्याची काळजी घ्या…. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मार्च २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
तुमच्या केलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कमी श्रमात कामे होतील. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल.दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कमला गती येईल.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *