Instagram Plus Subscription: इंस्टाग्राम वापरासाठी पैसे द्यावे लागणार? ‘Instagram Plus’मुळे मोठा बदल शक्य

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। सोशल मीडियाच्या जगात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. Meta आपल्या लोकप्रिय Instagram साठी ‘Instagram Plus’ नावाचा सशुल्क सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. हा प्लॅन लागू झाल्यास इंस्टाग्रामचा वापर पूर्णपणे बदलू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या हा प्लॅन टेस्टिंग टप्प्यात असून सर्वांसाठी अनिवार्य होणार का, याबाबत अजून स्पष्टता नाही.

‘Instagram Plus’ अंतर्गत वापरकर्त्यांना अनेक प्रीमियम फीचर्स मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अनोनिमस स्टोरी व्ह्यू, स्टोरी री-व्यू काउंट, वेगवेगळ्या ऑडियन्ससाठी स्वतंत्र लिस्ट, स्टोरीचा कालावधी वाढवण्याची सुविधा आणि हायलाइट बूस्टसारखे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. विशेषतः कंटेंट क्रिएटर्स आणि तरुण यूजर्ससाठी हे फीचर्स आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. सध्या मेक्सिको, जपान आणि फिलीपिन्समध्ये याची चाचणी सुरू असल्याचे रिपोर्ट्स सांगतात.

महत्त्वाची बाब म्हणजे, हा प्लॅन आधीपासून उपलब्ध असलेल्या ‘Verified’ प्लॅनपेक्षा वेगळा असेल. ‘Instagram Plus’ हा सामान्य वापरकर्त्यांसाठी प्रीमियम अनुभव देण्यासाठी तयार केला जात आहे. यासाठी दरमहा सुमारे १०० ते २०० रुपये आकारले जाऊ शकतात. मात्र, इंस्टाग्राम पूर्णपणे पेड होणार नाही, तर फ्री आणि पेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध राहण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात सोशल मीडिया वापराचं स्वरूप बदलू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *