Horoscope Today दि. ६ एप्रिल २०२६ ; आज अडचणीतून मार्ग काढता येईल..… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळते जुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
भाऊबंदकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *