Horoscope Today दि. ११ मे २०२६ ; आज योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मे २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडेपणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope )
भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *