Horoscope Today दि. २६ मे २०२६ ; आज भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. .………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.

वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्‍याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी.

मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
कौटुंबिक स्थैर्‍याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.

सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope )
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्‍यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.

तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
जवळचा प्रवास सावधानतेने करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात.

मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही.

मीन राशिभविष्य (Pisces Daily २० Horoscope)
सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *