![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. जुने ताण संपतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्यापैकी अनुकूल राहील.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope )
वाढीव कामातून लाभ मिळेल. कामात युक्ति वापरावी लागेल. आजच दिवस व्यस्त राहील. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
गरज लक्षात घेऊन काम करावे. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope )
हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
एकमेकात तुलना करू नका. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
साहसी कामे करतांना सावध राहावे. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मनातील नकार काढून टाका. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
कामाचा ताण हलका होईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
शाब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल.