Horoscope Today दि. ५ ऑगस्ट २०२६ ; आज दिवसभर कामाचा ताण राहील.……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope )
मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *