Horoscope Today दि. ९ ऑगस्ट २०२६ ; आज गोड बोलण्यावर भर द्यावा….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्‍यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
नवीन तंत्र शिकून घ्यावे. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
व्यवसाईकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
दिवस मजेत जाईल. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. उगाच चिडचिड करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *